Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवासा नगरपंचायतीच्या प्रभाग 13 ची 9 जानेवारीला पोटनिवडणूक

नेवासा नगरपंचायतीच्या प्रभाग 13 ची 9 जानेवारीला पोटनिवडणूक

16 ते 20 डिसेंबर अर्ज भरण्याची मुदत

नेवासा (शहर प्रतिनिधी) – सदस्यत्व अपात्रतेमुळे मतदारयादी कार्यक्रम जाहीर झालेल्या नेवासा नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक तेराच्या पोटनिवडणुकीची तारीख घोषित झाली असून 9 जानेवरी 2010 या दिवशी या प्रभागात पोटनिवडणूक होणार आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या वतीने या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 9 जानेवारी रोजी मतदान होणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपंचायतचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक तेरा मधील नगरसेविका फेरीजबी पठाण यांचे नगरसेवक अपात्र झाल्याने निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक 13 साठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 12 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या प्रभागात 795 इतकी मतदार संख्या आहे.

9 जानेवारी 2020 रोजी मतदान तर 10 जानेवारी मतमोजणी होणार आहे. 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर उमेदवारी दाखल करण्याचा अवधी असून 21 डिसेंबरला छाननी तर 27 डिसेंबरला माघार घेता येईल 9 जानेवारी रोजी मतदान सकाळी 7.30 ते 5.30 पर्यंत कै. सुंदरलाल गांधी विद्यालयात होणार असून मतमोजणी तहसीलच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन हे काम पाहणार आहे असल्याची माहिती समीर शेख यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या