Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नेवासाफाटा येथे दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली; तिघांना अटक, दोघे पसार

Share

सर्व आरोपी नेवाशाचे; 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

नेवासा (का.प्रतिनिधी)-  नेवासा पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास करत असताना नेवासाफाटा येथे दरोड्याचा तयारीत असलेल्या 5 जणांची टोळी पकडली. तिघांना अटक केली असून दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान काल अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

याबाबत पोलीस नाईक जयवंत तोडमल यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 13 ऑक्टोबर रोजी रात्री मी, पोलीस उपनिरीक्षक श्री. शेवाळे उपनिरीक्षक श्री. दातडे, हवालदार गायकवाड, गिते, पोलीस नाईक यादव, सुहास गायकवाड असे आम्ही कोम्बिंग ऑपरेशनसाठी रात्री दीड वाजेच्या सुमारास नेवासाफाटा येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना नगर-औरंगाबाद रोडवरील पायल हॉटेलजवळ पाच इसम हातात लाकडी दांडके घेऊन मोटारसायकलसह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने उभे असलेले दिसून आले. त्यांना आम्ही हटकताच ते तेथून पळून जाऊ लागले. म्हणून आम्ही त्यांचा पाठलाग सुरू केला असता त्यापैकी तिघांना आम्ही पकडले. बाकी दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

पकडलेल्या इसमास त्यांचे नाव, गाव विचारता त्यांची नावे जॉकी रमेश चांदणे (वय 24), राजू अजिज शेख (वय 25) व मुस्तफा गफूर बागवान (वय 21) सर्व रा. नेवासा खुर्द अशी असल्याचे सांगितले. सदर इसमांना पळून गेलेल्या दोघांबद्दल विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडून यामाह कंपनीची आर-वन मोटारसायकल (एचएच 20 एफसी 8992) बाबत विचारपूस करता उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर इसमांकडून त्यांच्या हातातील लाकडी दांडके व जॉकी चांदणे याच्यो पॅन्टचे खिशात मिरची पूड असे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आल्याने पोलीस उपनिरीक्षक भारत दाते यांनी दोन पंचांना बोलावून पंचनामा करून जप्त केले.

पाच जण हातात मिरची पूड, लाकडी दांडके, मोटारसायकल अशा दरोडा टाकण्याच्या संशयाने मिळून आले. या फिर्यादीवरून वरील तिघा संशयितांवर भारतीय दंड विधान कलम 399 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!