Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सातार्‍यातील ‘नवलेवाडी’सारखा नेवाशातही प्रकार!

Share

‘बॅट’चे बटण दाबल्यावर ‘कमळा’समोरचा दिवा लागल्याच्या तक्रारी

नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा विधानसभा मतदारसंघातील नेवासा बुद्रुक व साईनाथनगर येथील मतदान केंद्रांमधील मतदान यंत्रांतही सातार्‍यातील ‘नवलेवाडी’सारखा प्रकार घडल्याची चर्चा नेवासा तालुक्यात सुरू असून मतदानाच्या दिवशीच अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात आणून दिली तरी अधिकार्‍यांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याचा दावा काही कार्यकर्ते व मतदारांनी केली आहे. तालुक्यात याबाबत व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत निवडणूक अधिकारी काहीच बोलायला तयार नसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

याबाबत माहिती देताना काही मतदार म्हणाले की, निवडणूक यंत्रात मोठा घोळ होता. सात नंबरचे बटण दाबल्यावर एक नंबरला लाइट लागला असल्याचे आम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. याबाबत अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात आणून दिली तरीही आमची तक्रार घेण्यात आली नाही असे बाळासाहेब कोकणे यांनी सांगितले.

नेवाशात जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रात लागलेल्या रांगा सायंकाळी उशिरापर्यंत होत्या. पहिल्यांदाच एवढे विक्रमी मतदान झाले. नेवासा बुद्रुक व साईनाथ नगर व अन्य काही ठिकाणी मतदान यंत्रात घोळ असल्याचे अनेकांनी अधिकार्‍याच्या निदर्शनास आणले. नेवासा बुद्रुक येथे या विषयामुळे नागरिकांत मोठी नाराजी दिसून आली. आम्ही सात नबरचे बटणन दाबले की 1 नंबरचा दिवा लागला असे महिलांनीही अधिकार्‍यांना सांगितले. त्यानंतर क्रांतिकारी पक्षाच्या अनेक समर्थकांनी मोठी गर्दी केली व तक्रार दाखल करण्याची मागणी केली.

परंतु तक्रार दाखल झाली नाही. याबाबतचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियात पसरले आहे. याबाबत बोलताना बाळासाहेब कोकणे यांनी सांगितले की नेवासा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 80% इतके विक्रमी मतदान झाले आहे. आणि हे मतदान विद्यमान आमदाराच्या विरोधात होते. लोक उत्स्फुर्तपणे जथ्या जथ्याने मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावत होते.

परंतु हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदान करताना शंकरराव गडाख यांच्या ‘बॅट’ या चिन्हासमोरील बटण दाबल्यानंतर भाजपच्या उमेदवाराच्या ‘कमळ’ या चिन्हासमोर लाल लाईट लागत होता. तहसलीदार त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही त्यांना यासंदर्भातील सर्व पुरावे दाखविले व आमची तक्रार दाखल करुन घेण्याची विनंती केली, परंतु त्यांनी आमची तक्रार दाखल करुन घेण्यास सपशेल नकार दिला.नेवासा तालुक्यात विक्रमी मतदान होऊनही जर भविष्यात म्हणजे उद्याच्या निकालामध्ये इव्हीएममुळे निकालावर परिणाम झाला तर, त्या विरोधात नेवासा तालुक्यातील जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!