नेवासा नगरपंचायतीवर क्रांतिकारी शेतकरीचे वर्चस्व

0

स्थायी समिती- संगीता बर्डे, नियोजन व विकास-नंदकुमार पाटील, महिला व बालकल्याण- अंबिका इरले, अर्थ व बांधकाम लक्ष्मण जगताप, पाणीपुरवठा फारूक आत्तार, स्वच्छता- सचिन वडागळे

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा नगरपंचायतीच्या सर्वच समित्यांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वर्चस्व सिद्ध झाले. 23 जून रोजी नेवासा नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये स्वीकृत संचालक व विविध समित्यांचे गठण करण्यात आले होते.

या सर्व समित्यांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगर पंचायतीमध्ये बहुमत असल्याने प्रत्येक समितीमध्ये क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे 3 जण तर भाजप मित्र पक्षाचे 2 जण निवडले गेले होते. आज पुन्हा एकदा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेऊन या समित्यांचे सभापती निवडण्यात आले. त्यामध्ये सहायक म्हणून प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांनी काम पाहिले.

नेवासा नगरपंचायतीच्या स्थायी समितीचे सभापतीपद पदसिद्ध अध्यक्ष असल्याने नगराध्यक्ष संगीता बर्डे यांच्याकडेच राहिले व स्थायी समितीवर लक्ष्मण जगताप, फारुक आत्तार व अंबिका इरले यांना समिती सदस्य म्हणून निवडण्यात आले.

नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील तर इतर सदस्य फिरोजबी इमामखान पठाण, संदीप बेहळे, सचिन नागपुरे, दिनेश व्यवहारे यांची निवड झाली.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी अंबिका अंबादास इरले तर इतर सदस्य म्हणून योगिता सतीश पिपंळे, अर्चना जितेंद्र कुर्‍हे, सीमा राजेंद्र मापारी, डोकडे अनिता भारत यांची निवड झाली.

अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतीपदी लक्ष्मण जगताप तर इतर सदस्य योगिता सतीश पिंपळे, सचिन वडागळे, सचिन नागपुरे, रणजीत सोनवणे यांची निवड झाली.

पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी फारूक आत्तार तर इतर सदस्य संदीप बेहळे, अर्चना जितेंद्र कुर्‍हे, रणजीत सोनवणे, निर्मला सचिन सांगळे यांची निवड झाली.

स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी सचिन वडागळे तर इतर सदस्य नंदकुमार पाटील, पठाण फिरोजबी इमामखान, शालिनी सुखदान, निर्मला सचिन सांगळे यांची निवड झाली.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगराध्यक्ष संगीता बर्डे यांची निवड झाली पण क्रांतिकारी पक्षाचे लक्ष्मण जगताप, फारूक आतार, अंबिका इरले स्थायी समितीच्या सदस्यपदी असल्याने या समितीवर क्रांतीकारीचे वर्चस्व दिसून येते.  

LEAVE A REPLY

*