Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नेवासा मतदारसंघात सर्वाधिक 80 टक्के मतदान

Share

विधानसभा निवडणूक । सर्वात कमी नगर शहरात । संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, पारनेर, कर्जत-जामखेड 70 टक्क्यांच्यापुढे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील बारा मतदारसंघातील 116 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. सोमवारी रात्री उशीरापर्यंत अनेक मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू होती. यामुळे मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी फायनल झाली. यात जिल्ह्यात 69.43 टक्के मतदान झाले असून सर्वाधिक 80.7 टक्के मतदान नेवासा तालुक्यात झालेले आहे. तर संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, पारनेर, कर्जत-जामखेड या मतदारसंघात 70 टक्क्यांहून अधिक मतदान झालेले आहेत. सर्वात कमी मतदान नगर शहरात 58 टक्के झालेले आहे.

उद्या गुरूवारी मतमोजणी होणार असून मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झीट पोलमुळे आता जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, पारनेर आणि कर्जत-जामखेड या प्रतिष्ठेच्या मतदारसंघातील लढतीत कोण बाजी मारणार याची चर्चा रंगली आहे. आपलाच उमेदवार कसा विजयी होणार याबाबतची आकडेमोड आणि ठोकताळे बंधतांना कार्यकर्ते दिसत आहेत.

मतमोजणीसाठी अजून एक दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने अनेकांची धडकी वाढली आहे. कल चाचणीमुळे भाजप-सेना युतीच्या गोटात आनंदाचे तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे माहोल आहे. गुरूवारी दुपारी या सर्वांचे उत्तर मिळणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 34 लाख 73 हजार 743 मतदारांपैकी 22 लाख 63 हजार 501 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही टक्केवारी 69. 43 इतकी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यात 72. 4 टक्के पुरूषांनी तर 66.59 टक्के महिलांनी मतदान केले. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील मतदानाची सरासरी टक्केवारीत अकोले 68.20 टक्के, संगमनेर 71.72, शिर्डी 70.67, कोपरगाव 76.23, श्रीरामपूर 63.93, नेवासा 80.07, शेवगाव 65.65, राहुरी 68.37, पारनेर 70.23, नगर शहर 58.28, श्रीगोंदा 67.66 आणि कर्जत-जामखेड 73.98 टक्के.

अकोले तालुक्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड आणि ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले डॉ. किरण लहामटे यांच्या रंगतदार लढत आहे. संगमनेरमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सेनेचे साहेबराव नवले यांनी लढत दिलेली आहे. कोपरगावमध्ये पारंपारिक कोल्हे-काळे लढतील अपक्ष राजेश परजणे आणि भाजपचे बंडखोर विजय वहाडणे यांनी उडी घेतल्याने सामाना रंगला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेलेे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा कितपत टिकाव लागणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

राहुरीत युवा प्राजक्त तनपुरे आणि ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांच्यातील टाईट फाईट आहे. नेवाशात शंकरराव गडाख यांनी भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांची दमछाक केलेली आहे. श्रीरामपुरात विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या पक्षांतरानंतर सेनेचे कार्यकर्ते त्यांना स्वीकारणार का? असा प्रश्न आहे. कर्जत-जामखेडमध्ये विद्यमानमंत्री प्रा.राम शिंदे आणि शरद पवारांचे नातू रोहित, नगरमध्ये माजी मंत्री अन् 25 वर्षे आमदार राहिलेले अनिल राठोड आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप, या प्रतिष्ठेच्या लढतीवर विविधांगी चर्चा रंगली आहे. आपापल्या परीने अन्वयार्थ काढत निकालाचे अंदाज वर्तविले जात आहेत.

प्रशासन गोंधळलेले…
नगर शहर मतदारसंघात किती मतदान झाले, यासंदर्भातील आकडेवारी देताना प्रशासन गोंधळले असल्याचे समोर आले. सुरुवातीला 48 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी सहीनिशी देण्यात आली. नंतर जिल्हा माहिती कार्यालयाकडून 58.28 टक्क्यांचा आकडा दिला गेला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!