नेवासा : चंपाषष्ठी निमित्त खंडोबा मंदिरात होमहवनसह झेंडा काठीची मिरवणूक

0

नेवासा : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त नेवासा शहरातील खुपटी रोडवर असलेल्या पुरातन खंडोबा मंदिरामध्ये शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

चंपाषष्ठी निमित्त नेवासा शहरातील दैवत असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये सकाळी मुख्य पुजारी दिलीप जाधव यांच्या हस्ते जलाभिषेक महाभिषेक घालण्यात आला. तसेच वेदमंत्राच्या जयघोषात दिलीप जाधव व सौ.सिंधूताई धव,बाळासाहेब गवळी, सौ.मनीषा गवळी यांच्या हस्ते होमहवन करण्यात आला यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न ग्रामपुरोहित बच्चू जोशी यांनी केले यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील व सौ.शुभांगीताई पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

यावेळी निघालेल्या झेंडाकाठी मिरवणुकीमध्ये नेतृत्व अशोक वैद्य मंदिर पुजारी दिलीप जाधव यांनी केले यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,विश्वस्थ राम देशपांडे,नरसुशेठ लष्करे, बबनराव वाव्हळ,आबा लोखंडे, सतीश चुत्तर,रमेश सुसे सहभागी झाले होते या मिरवणुकीचे नेवासा शहरामध्ये उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

झेंडा मिरवणुकीचा समारोप खंडोबा मंदिर प्रांगणात झाल्यानंतर खंडोबारायाच्या नावाने चांगभलं करत तळीभंडार कार्यक्रम भंडारा उधळत पार पडला.रमेश सुसे,पूजा जाधव,कृष्णा जाधव,आदित्य जाधव ,अभिजित सुसे,जितेंद्र जाधव ,धनंजय जगताप उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*