उरुसनिमित्त नेवाशात दर्ग्यावर आकर्षक रोषणाई

0
नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा येथील हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत कामिलवली बाबांच्या उरुसा निमित्त शनिवारी दि. 29 जुलै रोजी संदलची चादर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे सर्वधर्मीय बांधवांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हजरत कामिलवली बाबांच्या उरुसानिमित्त दर्ग्यावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई सर्वांचे आकर्षण ठरली.
कामिनपीर दर्ग्यापासून संदलच्या चादर मिरवणुकीस प्रारंभ झाला. पुष्पांनी सजविलेल्या संदलच्या चादरीचे ऊद अर्पण करून सर्वांनी दर्शन घेतले. मुख्य पेठेसह नगरपंचायत चौकामध्ये चादर मिरवणुकीचे तोफांची सलामी देत स्वागत करण्यात आले. देशभक्तिपर गीतांसह धार्मिक राष्ट्रीय ऐक्य निर्माण करणार्‍या गीतांच्या चालीवर मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणाईने ठेका धरला होता.

LEAVE A REPLY

*