न्यूयॉर्क : दलवीर भंडारी दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसच्या न्यायाधीशपदी

0

भारताचे दलवीर भंडारी हे आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायाधीश म्हणून निवडले गेले आहेत.

अखेरच्या क्षणी ब्रिटनने आपला उमेदवार मागे घेतल्याने दलवीर भंडारींचा विजय झाला.

भंडारी यांचा सध्याचा कार्यकाल 5 फेब्रुवारी 2018 रोजी संपत आहे. तत्पूर्वी भारताने या पदावरील फेरनियुक्तीसाठी त्यांचे पुन्हा नामांकन जाहीर केले होते.

 

न्यू यॉर्कमध्ये असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात ही निवडणूक पार पडली.

दलवीर भंडारी यांना 193 पैकी 183 मतं मिळाली, तर सुरक्षा परिषदेच्या सर्वच्या सर्व 15 सदस्यांनीही त्यांनाच मत दिलं. याआधी नाट्यक्रम घडामोडी घडल्या आणि ब्रिटनने निवडणूक पार पडण्याच्या काही क्षण आधीच आपली उमेदवारी मागे घेतली, ज्यामुळे दलवीर भंडारी यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.

LEAVE A REPLY

*