Friday, April 26, 2024
Homeनाशिकदहिंदुले आश्रमशाळेत योगासनांनी झाली नववर्षाची सुरुवात

दहिंदुले आश्रमशाळेत योगासनांनी झाली नववर्षाची सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी 

बागलाण तालुक्यातील दहिंदुले येथील शासकीय आश्रमशाळेत आज नववर्षाची अनोख्या पद्धतीने सुरुवात करण्यात आली. सूर्योदयाच्या वेळी येथील मुलींनी क्रीडाशिक्षक अमृता बोरसे यांच्यासोबत योगप्रशिक्षणाला सुरुवात केली. यावेळी मुख्याध्यापिका व्ही.बी. चव्हाण यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले.

- Advertisement -

वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात.

परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होत असल्याचे बोरसे म्हणाल्या. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

असे आहेत योगाचे फायदे

१. शरिराची सर्व स्तरांवर तंदुरुस्ती राखण्यात योगाची मदत होते.
२. नियमीत योगा केल्यास वजनात घट होते.
३. ताण तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे.
४. योगा केल्याने मन प्रसन्न व शांत ठेवण्यास मदत होते.
५. शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते .
६. सजगतेत वाढ होते .
७. नाते संबंधात सुधारणा करण्यासाठी योगा महत्‍त्‍वापूर्ण ठरतो.
८. शरिराची उर्जा शक्ती वाढविण्यास योगासारखा दुसरा पर्याय नाही
९. लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते
१०. अंतर्ज्ञानात वाढ होण्यास मदत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या