Type to search

Featured सार्वमत

नवमतदारांची नोंदणी सुरू

Share

विधानसभा निवडणुकीची तयारी । 19 ऑगस्टला फायनल मतदार यादी

अहमदनगर (प्रतिनिधी) – तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. 1 जानेवारी 2019 ला वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावे मतदार यादीत नोंदण्यासाठी बीएलओ नियुक्त करण्यात आल्याची माहिती कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी दिली. 19 ऑगस्ट रोजी फायनल मतदार यादी प्रसिध्द केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली असून मतदार यादी अद्यावत करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. 15 जुलै रोजी प्रत्येक तहसील कार्यालयात प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मतदार यादीत नाव नसणार्‍यांनी नव्याने नाव नोंदणी करण्यासाठी 8 नंबरचा फॉर्म भरून द्यायचा असून नाव वगळण्यासाठी 7 नंबरचा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. मतदार यादीत प्रथमच नाव नोंदविणार्‍यांसाठी 6 नंबर फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. 30 जुलै पर्यंत नवमतदारांची नोंदणी केली जाणार आहे. 20,21,27 आणि 28 जुलै रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. 5 ऑगस्टला मतदार नोंदणी अधिकारी त्याचे व्हेरिफिकेशन करणार आहेत. मतदार नोंदणीच्या हरकतीवर 13 ऑगस्टपर्यंत निर्णय दिला जाणार आहे. 9 ऑगस्टला फायनल मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

दुबार अन् महिलांवर लक्ष
मतदार यादीत दुबार नाव असलेल्यांची नावे वगळली जाणार आहे. स्थलांतर झाले असल्यास जेथे वास्तव्य आहे तेथेच नाव ठेवून 7 नंबर फॉर्म भरून दुबार नाव वगळण्यात यावे असे आवाहन निवडणूक शाखेने केले आहे. प्रारूप मतदार यादीत स्त्री-पुरूषांचे प्रमाण 918 इतके आहे. स्त्री मतदार कमी असल्याने त्यांच्या नाव नोंदणीकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!