ग्रुप कॉलिंगासाठी व्हॉट्सअपचे नवीन फीचर्स

0

मुंबई : एकमेकांना जोडणाऱ्या व्हॉट्सअपने वापरकर्त्यासाठी पुन्हा एकदा नवीन फीचर्स आणले आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपने ग्रुप कॉलिंगचे फीचर्स आणले होते. या फीचर्सच्या मदतीने वापरकर्त्यांना आपल्या ग्रुपमध्ये वॉइस आणि व्हिडिओ फोन करता येत होते. कंपनीने यात बदल करीत या फीचरमध्ये नवी अपडेट आणली आहे. हे फीचर्स अपडेट केल्यानंतर ग्रुप कॉलिंग आणखीन सोपे होणार आहे.

याआधी ग्रुप कॉलिंग कॉल करणाऱ्यासाठी यूजर्सना एक-एक ऍड करावे लागत होते. आता व्हॉट्सअपने अँड्रॉइड ऍपसाठी नवीन अपडेट आणले आहे. यामध्ये ग्रुप कॉलिंगसाठी एक वेगळे बटण आणले आहे. यामुळे ग्रुप कॉलिंग कॉलसाठी वापरकर्ते एकाच वेळी ग्रुपमध्ये सर्वाना ऍड करु शकते. पहिले हे फीचर्स IOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते. परंतु आता हे अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले आहे.

या नविन फीचर्सचा वापर करण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप अँड्रॉइडचे लेटेस्ट स्टेबल वर्जन डाउनलोड करावे लागेल. त्यासाठी गूगल प्ले स्टोरवर जाऊन व्हॉट्सअप अपडेट करावे लागेल.

LEAVE A REPLY

*