वेब सिरीजचा बदलता ट्रेंड : कुठलाही जॉब वाईट नसतो..पण शेवटी जॉब हा जॉबच असतो…

0
कोणताही जॉब वाईट नसतो..जॉब हा जॉब असतो…असा आशय असणारी कॅफेमराठीची पहिली मराठी वेब सिरीज सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.

सध्या सगळीकडेच डिजिटलची जोरदार क्रेझ आहे. विशेष करून तरुण वर्गाचा अधिक वेळ हा स्मार्ट फोन आणि डिजिटलवर जातो. डिजिटलमध्ये मनोरंजन हा देखील आता महत्वपूर्ण घटक झाला आहे. महाराष्ट्रात इंटरनेटची वापरणाऱ्यांची संख्या देखील झपाटयाने वाढते आहे.

इंटरनेट युजर्सना डिजिटलमध्ये हवा तसा आशय मिळत नव्हता. अल्पावधीत कॅफेमराठी युट्यूब चॅनलची प्रेक्षक संख्या एक कोटी ऐंशी लाखाहून अधिक झाली आहे.

तरुणाईच्या स्टाईलने सामाजिक संदेश देत कॅफेमराठीने ‘डॉटेड की फ्लेवर्ड’ ही नवीन धमाकेदार अशी मराठी वेब सिरीज युट्यूबवर प्रदर्शित केली आहे. पाच एपिसोडमध्ये असणाऱ्या या सिरीजचे दिग्दर्शन संदीप नवरे यांनी केले आहे.

एका वेब सिरीजचा विशेष खेळ सिनेमागृहात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मराठी अभिनेते सिद्धार्थ जाधव, तृप्ती जाधव, दिग्दर्शक राजू मेश्राम इ. उपस्थित होते.

मला खरोखर आनंद होतो आहे कि, कॅफेमराठीने त्यांच्या पहिल्याच वेब सिरीजचा इतक्या जल्लोषात विशेष खेळ आयोजित केला. कॅफेमराठीचे संस्थापक निखील रायबोले, भुपेंद्रकुमार नंदन आणि दिग्दर्शक संदीप नवरे यांचे मी प्रथम अभिनंदन करतो.

महत्वाचं म्हणजे इतका धाडसी विषय त्यांनी इतक्या सहजपणे सिरीजच्या माध्यमातून मांडला ही खूप विशेष बाब आहे. कलाकार विभव राजाध्यक्ष, अनिता महाजन, अशोक साळवी, नेहा परांजपे, सीमा कुलकर्णी, रोहित माने, दिपेश ठाकरे, अरुण नलावडे, सौरभ अरोटे, नम्रता प्रधान आणि भुपेंद्रकुमार नंदन या सर्वांच्या कामाचे कौतुक त्यांनी केले.

तरुणांच्या मनात नेमकं काय चाललं हे समजणे फार कठीण असते, मग त्यांना काय बघायला आवडेल हे तर त्याहून कठीण. मग आम्ही तरुणांच्या जवळचा विषय म्हणजे..जॉब या भोवती एक कथानक गुंफले. डॉटेड की फ्लेवर्ड या शिर्षकाखाली त्याचे पाच भाग कॅफेमराठीच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात येतील.

एका सामान्य तरुणाची ही गोष्ट आहे जि बघतांना तुम्हाला रोजच्या आयुष्यातील घटना आणि प्रसंग नक्कीच आठवतील. कोणताही जॉब वाईट नसतो, जॉब हा जॉब असतो असा संदेश आम्ही यातून देत एक वेगळ्या मार्गाने समाजप्रबोधन देखील करत आहोत, परंतु तरुणांना ज्याप्रकारचे आशय बघायला आवडतात त्याप्रकारात आम्ही त्याचे सादरीकरण केल्याने आमचा हेतू सफल झाल्याचे वाटते असे दिग्दर्शक सांगतात.

LEAVE A REPLY

*