गरब्यासह ‘सालसा-वेस्टर्न’कडे तरुणाईचा वाढता कल

0
नाशिक | (प्रसाद जगताप) | तरुणाईसह आबालवृद्धांना ठेका धरायला लावणारा नवरात्रोत्सव आठवडाभरावर येवून ठेपला आहे. नवरात्रीमध्ये ढोलाच्या तालावर, संगीताच्या लयीत गरबा नृत्यात हरवून जाण्यासाठी तरुणाई पारंपरिक गरब्यासह सालसा आणि वेस्टर्न नृत्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुकांच्या गर्दीने शहरात ठिकठिकाणी प्रशिक्षण वर्ग  भरू लागले आहे.
गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक गरब्याबरोबरच पाश्‍चिमात्य नृत्यशैलीचा स्वीकार करतांना आजची तरुणाई उत्सुक आहे. यांत प्रामुख्याने एकताली, दोनताली, तीनताली,  सालसा, बेलीनृत्य, सोनेडो, हिपहॉप  तसेच  झुम्बा नृत्य करण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत.
गरबा हा पारंपरिक नृत्यप्रकार असला तरी गेल्या काही वर्षांत त्यातील संगीत तसेच नृत्यशैलीला आधुनिक बाज आला आहे. वेशभूषा आकर्षक करण्यासोबतच नृत्याच्या सरावावरही आता तरुणवर्ग लक्ष  देऊ लागला आहे.
२१ सष्टेंबरपासून सुरू होणार्‍या नवरात्रोत्सवाचे वेध तरुणाईला लागले आहेत. यासाठी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून मोठ्या जोमाने तयारी सुरू आहे. नवरात्रोत्सवामध्ये खेळल्या जाणार्‍या दांडिया यांचे  तरुण-तरुणींपासून आबालवृद्धांमध्ये दांडियाचे वेध लागले आहे.
शहरातील मूर्तिकार देवींच्या मूर्तींवर अंतिम रंगरंगोटीच्या कामात व्यस्त आहेत. तसेच युवक-युवती तसेच महिलांसाठी गरबा, टिपरी नृत्याचे प्रशिक्षण वर्ग अनेक ठिकाणी सुरु आहे.
ज्या मंडळातर्फे नवरात्रोत्सव आयोजित केल्या जातात, त्यांनीही उत्सव साजरा करण्यासाठीच्या तयारी अंतिम टप्यात आहे.
गेल्या काही वर्षांपासून गरबा व रास दांडियाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गुजराथी बांधवांतर्फे नवरात्रोत्सवात रास दांडिया व गरबाचे आयोजन केले जाते होते. आता मात्र हा उत्सव फक्त गुजराथी बांधवांपुर्ता राहिला नसून, तो सर्वस्तरीय झाला आहे. तरुणाईला या कार्यक्रमाचे मोठे आकर्षण असते. यामुळे शहरातील विविध मंडळांनी गरबा, टिपरी नृत्याचे प्रशिक्षण सुरू केले आहे.
आमच्या प्रशिक्षण शिबिरात गेल्यावर्षीपेक्षा अधिक नोंदणी केली असून गरबा-दांडियासाठी नाशिककरांचा विशेषत: तरुणाईचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गुजरातमधील पारंपरिक गरब्यासह एकताली, दोनताल आणि सालसा आणि वेस्टर्न गरबाचे प्रशिक्षण आमच्या प्रशिक्षण वर्गात दिले जात आहे.

   – कौस्तुभ जोशी, नृत्य प्रशिक्षक, के. स्टुडिओ, गीतगुंजन

LEAVE A REPLY

*