मुरघास व कडबाकुट्टीसाठी पशुसंवर्धनची नविन योजना

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्र पुरस्कृत राष्ट्रिय पशुधन अभियान योजने अंतर्गत पशुपालकांना कडबाकुट्टी यंत्र व मुरघास युनिटसाठी अनुदान मिळणार आहे.  दरवर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सदर योजना राबविली जाते. त्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत सुरू आहे.

त्यात पुन्हा नव्याने राष्ट्रिय पशुधन अभियान योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल करणार्‍या पशुपालकांना कडबाकुट्टी यंत्र व मुरघास युनिटसाठी अनुदान मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी 9 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. सदर प्रस्तावांची जिल्हास्तरावर छाननी होणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ड्रॉ पध्दतीने लाभार्थींची निवड होणार आहे. मुरघास युनिटसाठी 75 हजार रुपयांपैकी 60 टक्के म्हणजे 45 हजार रुपये तर, विद्युुतचलित कडबाकुट्टी यंत्रासाठी 16 हजार रुपयांपैकी 8 हजार रुपये मिळणार आहेत. असे एकूण दोन्ही मिळून 53 हजार अनुदान आहे.

सदर योजनेमध्ये अनुसूचित जातीमधून 6 तर, सर्वसाधारणमधून 20 लाभार्थी निवडण्यात येणार आहे.यामध्ये 8 टक्के अनुसूचित जमाती प्रवर्ग व 30 टक्के महिला व 3 टक्के अपंग पशुपालकांची निवड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने दिली.

कडबाकुट्टीसाठी 50 टक्के अनुदान –
सर्वसाधारण 130 लाभार्थी, अनुसूचित जाती 42 लाभार्थी निवडण्यात येणार आहेत.सर्वसाधारण 130 मधून 8 टक्के अनुसूचित जमाती प्रवर्ग व 30 टक्के महिला व 3 टक्के अपंग पशुपालकांची निवड केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*