कॉपी रोखण्यासाठी नवी शक्कल; हे आहेत बोर्डाचे नवे नियम…

0
पुणे : राज्यात फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये होणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार, दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ ते २४ मार्च २०१८ दरम्यान, तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत होणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर बोर्डाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जाहीर केले आहेत. बोर्डाची परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याला आता परीक्षेला वेळेआधीच पोहोचावे लागेल. जर विद्यार्थ्याला एक मिनिटही उशीर झाला तरी त्यास आता परीक्षा खोलीत प्रवेश मिळणार नाही. तसेच वेळ संपल्यानंतरच आता परीक्षेच्या हॉलबाहेर प्रवेश मिळणार आहे.

स्मार्टफोनच्या जमान्यात आता प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. त्यामुळे आता अशा प्रकारांवर आळा घालण्यात यावा यासाठी बोर्डाने नियम कडक केले आहेत.

अनेकदा स्कॉड आल्यानंतर कॉपी मिळून आली तर शिक्षकालाही दोषी धरले जाई. त्यामुळे शिक्षकांचीही अशा प्रकारामुळे प्रतीमा मलीन होत होती.

परंतु बोर्डाने आता नियम कडक केल्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्यात यश येणार असल्याचे सांगत शिक्षक वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

*