जंगली चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

0
मुंबई – विद्युत जामवाल लवकरच ‘जंगली’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विद्युत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ज्यात विद्युत जबरदस्त स्टंट साकारताना दिसत होता. आता या चित्रपटातील एक नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

माणूस आणि प्राण्यातील मैत्रीच्या नात्यावर हा चित्रपट भाष्य करतो. राज (विद्युत जामवाल) याची भोला या हत्तीशी घनिष्ठ मैत्री असते. मात्र, तस्करांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट भोलाच्या मागावर असते. त्यांच्या तावडीतून भोलाला वाचवण्यासाठी राजला काय संघर्ष करावा लागतो याची ही रंजक कथा आहे. विद्युत जामवाल, पूजा सावंत व अतुल कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे.

फेमिनानं आज या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रसिद्ध केलं. शिकाऱ्याच्या भूमिकेत असलेला अतुल कुलकर्णी भोलाला मारण्याच्या प्रयत्नात असून राज आपल्या मित्राला वाचवण्यासाठी लढा देताना पोस्टरमध्ये दिसतो आहे. हे पोस्टर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारं ठरणार आहे.

जंगली चित्रपट २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक शक रसेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर विनीत शर्मा आणि प्रिती सहानी या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात विद्युतशिवाय पुजा सावंत, आशा भट्ट आणि अतुल कुलकर्णी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

*