नवीन पदाधिकारी कर्मचार्‍यांसाठी ठरले शुभशकून

0
रखडलेल्या विनंती, आपसी बदल्यांना मुहूर्त
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना नूतन पदाधिकारी शुभशकून ठरला आहे. या नूतन पदाधिकार्‍यांच्या काळात कित्येक वर्षानंतर रखडलेल्या विनंती आणि आपसी बदल्यांना यंदा मुहूर्त मिळाला आहे.
यामुळे कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता बदल्या झालेल्या कर्मचारी त्यांच्या नवीन नेमणुकीच्या ठिकाणी कामावर हजर झाले असल्याची माहिती जि. प. समान्य प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली.
अलिकडच्या काही वर्षात यंदा पहिल्यांदा जिल्हा परिषद प्रशासनाने सर्वाधिक 90 कर्मचार्‍यांचा विनंती बदल्या मान्य केल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांच्या प्रयत्नातून ऐवढ्या संख्याने कर्मचार्‍यांच्या सोईच्या बदल्या झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच 428 जि.प. कर्मचार्‍यांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यात पेसा क्षेत्रातून विनंती बदलीने 33 कर्मचारी आदिवासी भागातून बाहेर आले आहेत. तर 24 कर्मचारी पेसातर्ंगत आदिवसी भागात पोहचले आहेत. आदिवासी भागात प्रशासकीय बदलीने 24 कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. विनंती बदलीची संख्या 90 पर्यंत असून एकतर्फी विनंती बदलीची संख्या 85 आहे. आपसी बदल्याची संख्या 86 असून प्रशासकीय बदल्याची संख्या 23 आहे.
जिल्हा परिषदेत अलिकडच्या काही वर्षात कर्मचार्‍यांच्या आपसी आणि विनंती बदल्यांना बे्रक लागला होता. यामुळे कर्मचार्‍यांच्या मनात खदखद होती. मात्र, नुतन पदाधिकारी यांच्या आग्रहामुळे आणि प्रशासनाने सहकार्य केल्याने आपसी आणि विनंती बदल्या झाल्याने कर्मचारी समाधानी झाले आहेत.

विभागनिहाय झालेल्या बदल्या
ग्रामपंचायत विभाग : ग्रामसेवक 82, विस्तार अधिकारी संख्याकिक 4, विस्तार अधिकारी पंचायत समिती 3, ग्रामविकास अधिकारी 17.
लघुपाटबंधारे विभाग : कनिष्ठ अभियंता 7.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग : कनिष्ठ अभियंता 4.
शिक्षण प्राथमिक विभाग : केंद्र प्रमुख 16, विस्तार अधिकारी शिक्षण 7.
पशूसंवर्धन विभाग : साहय्यक पशूधन विकास अधिकारी 2, पशूधन पर्यवेक्षक 17, व्रणोपचारक 1.
सामान्य प्रशासन विभाग : कक्ष अधिकारी 1, कार्यालयीन अधीक्षक 3, वरिष्ठ साहय्यक 7, कनिष्ठ साहय्यक 33, वाहन चालक 1, परिचर 11.
आरोग्य विभाग : आरोग्य सेवक पुरूष 22, आरोग्य सेवक 64, औषध निर्माण अधिकारी 12, आरोग्य साहय्यक महिला शुन्य, परिचारीका 8, आरोग्य सहय्यक पुरूष 6, आरोग्य पर्यवेक्षक 1 यांचा समावेश आहे.
बांधकाम उत्तर विभाग : स्थापत्य अभियांत्रिकी शुन्य, कनिष्ठ अभियंता 12.
अर्थ विभाग : साहय्यक लेखाधिकारी शुन्य, कनिष्ठ लेखाअधिकारी 1, वरिष्ठ साहय्यक 2, कनिष्ठ साहय्यक शुन्य.
महिला व बालकल्याण विभाग : पर्यवेक्षीका 18.
कृषी विभाग : कृषी अधिकारी 1, विस्तार अधिकारी शुन्य.

LEAVE A REPLY

*