Type to search

क्रीडा मुख्य बातम्या

क्रिकेटमध्ये आता आधुनिक ‘नो बॉल’ तंत्रज्ञान

Share

मुंबई | प्रतिनिधी

बीसीसीआयकडून आयसीसीला करण्यात आलेल्या मागणीनुसार आता नो बॉल ओळखण्यासाठीचे नवीन तंत्रज्ञाननाचा अवलंब करण्यात येणार आहे. आयसीसीने प्रायोगिक तत्वावर हे तंत्रज्ञान राबविण्याचे ठरवले आहे. यामुळे नो बॉलमुळे सामन्याचे नुकसान टाळता येणार आहे. नो बॉलवर यापुढे कशाप्रकारे वॉच ठेवता येईल हेदेखील या तंत्रज्ञानात सोप्पे होणार आहे.

आत्तापर्यंत मैदानात खेळ सुरु असताना केवळ मैदानावरील पंच नो बॉल बाबत निर्णय द्यायचे. अनेकदा नो बॉल असूनही पंचांकडून याबाबत लक्ष न गेल्याने निर्णय दिला जायचा नाही. नो बॉलमुळे पंच आणि खेळाडू वादही झाले आहेत. थर्ड अम्पायरची मदत फक्त याआधी धावबाद, यष्टीचीत किंवा डीआरएससाठी होत असे.

या तंत्रज्ञानाचा फायदा सामन्यात मैदानावरील पंचाची नजर चुकवून नो बॉल टाकण्याच्या प्रकाराला आळा बसेल. तसेच सामना पारदर्शक व्हायलाही यामुळे मदत मिळणार आहे.

दरम्यान, हे तंत्रज्ञान प्रचंड खर्चिक असून एका सामन्यासाठी हजारो डॉलरपर्यंत खर्च आयसीसीला येऊ शकतो. आयसीसीने सध्या प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचा वापर करायचे ठरवले आहे त्यामुळे भारतात होणाऱ्या सामन्यांमध्ये लवकरच हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. मात्र, ते किती दिवस चालेल याबाबत अद्याप सांगण्यात आले नाही.

नो बॉल तंत्रज्ञान आहे तरी काय?

या तंत्रज्ञानामध्ये गोलंदाजाच्या पायावर कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिसरा पंच लक्ष (थर्ड अम्पायर) ठेवतील. गोलंदाजाचा पाय जर क्रिसच्या पुढे पडत असेल तर त्याविषयी हा तिसरा पंच ताबडतोब मैदानावरील पंचाला माहिती देईल व मैदानावरील पंच याबाबत निर्णय देतील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!