नाशिकमध्ये झेंडूच्या मागणीत वाढ; भाव वधारल्याने शेतकरी आनंदात

0

नवीन नाशिक, ता. ३० : येतील पवननगर बाजारात झेंडू फुलांचा तुटवडा निर्माण झाला. मागणी पेक्षा पुरवठा कमी झाल्याने भाव वधारले आहेत. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान फुलांच्या शोधात ग्राहक हवालदिल होत असल्याचे चित्र आहे. कालच्या २०० रु प्रति जाळीचा भाव वाढून २०० ते ३००  रु. प्रती शेकडा झाले आहेत. तर जाळीचा भाव ६०० ते  ८५० रुपयांपर्यन्त पोहोचला आहे.

भाववाढ झाल्याने शेतकरी व विक्रेते आनंदित झाले असले तरी सामान्यजनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

त्रिमूर्ती चौक, शिवाजी चौक आणि पाथर्डी फाटा येथेही फुलांची अशीच परिस्थिती दिसून आली. हारांचे भाव देखील वाढले असून ५० व  १०० रु. चे हार १५० व  २५० रुपयांना विकले जात आहेत.

महामार्गावरही ट्रक चालकांकडून तयार हारांना मागणी होत असल्याने ३० ते ५० रुचे हार आज १०० ते १५० रुपयांना ला विकले जात आहेत.

LEAVE A REPLY

*