देशदूत इम्पॅक्ट : अखेर प्रभाग २५ झाला वीज तारामुक्त

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी):- येथील प्रभाग क्र.२५ मधील वीज तारांचे भूमिगतिकरण होऊनही दोन वर्षांपासुन वीज जोडणी करण्यात आली नव्हती.

तसेच डोक्यावरच्या वीजताराही काढल्या जात नव्हत्या. यासंदर्भात दै.देशदूत मधून बुधवार दि.२६ रोजी वृत्त प्रसिद्ध करताच त्याची दखल घेऊन आमदार सीमा हिरे यांनी तातडीने संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना धारेवर धरत काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार गुरुवार दि.२७ रोजी संबंधित ठेकेदाराकडून युद्धपातळीवर वीज जोडणीचे काम हाती घेऊन दोन दिवसात पूर्ण करण्यात आले.

तर आज शनिवारी डोक्यावरील वीजताराही उतरविण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांनी आंनद व्यक्त केला.

दरम्यान अवघ्या दोन दिवसात काम पूर्ण होताच आमदार सीमा हिरे यांनी कामाची पाहणी केली व नागरिकांची भेट घेतली.

यावेळी स्थानिक महिलांनी आमदार हिरे यांचे आभार मानत त्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी आमदार हिरे यांनी देशदूतचा विशेष उल्लेख करून देशदूतचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*