नाशिक जिल्ह्यात नवे पाच कोरोना संशयित दाखल; शहरात चार तर मालेगावमध्ये एक संशयित रुग्ण

नाशिक जिल्ह्यात नवे पाच कोरोना संशयित दाखल; शहरात चार तर मालेगावमध्ये एक संशयित रुग्ण

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेला नाही. मात्र गुरुवारी रात्री (दि.२६) ५ संशित रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. यात महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात चार तर, मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये एका रुग्णाचा सामावेश आहे.

या पाचही रुग्णांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत 60 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत.

नाशिक जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षामध्ये गेल्या दोन दिवसांपासून एकही कोरोना संशयित रुग्ण नव्याने दाखल झालेला नाही. तर, नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयामध्ये गुरुवारी चार नवीन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

तसेच, मालेगाव येथील सामान्य रुग्णालयामध्ये नवीन एक कोरोना संशयित रुग्ण दाखल झाला आहे. या पाचही रुग्णांचे स्वॅबचे नमुने कोरोना चाचणी करण्यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले आहेत. या नमुन्यांचा रिपोर्ट शनिवारी सायंकाळपर्यंत प्राप्त होण्याची शक्‍यता आहे.

हे पाचही रुग्ण परदेशातून जिल्ह्यात आलेले असून त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास होतो आहे. त्यामुळे त्यांना कोरोना विषाणू विलगीकरण कक्षामध्ये दाखल करून घेण्यात आलेले आहे.

साडेपाचशे परदेशी नागरिक दाखल

आत्तापर्यंत परदेशातून 553 नागरिक शहर-जिल्ह्यात दाखल झालेले असून, यापैकी 412 नागरिक होम-क्वारंटाईन आहेत. त्यांची 14 दिवसांची दैनंदिन चाचणी सुरू आहे. तर, 141 नागरिकांचे होम-क्वारंटाईनची चाचणी पूर्ण झालेली आहे. आत्तापर्यंत 65 जणांच्या स्वॅबचे अहवाल तपासणीत 60 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत तर पाच जणांचे अहवाल प्रलंबीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com