Type to search

Featured टेक्नोदूत

आता इंस्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअँँपवरही येणार हे नवीन फिचर

Share

वृत्तसंस्था

सर्वाधिक लोकप्रिय असलेले प्रसिद्ध मेसेंजर व्हॉट्सअँँप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांना नवनवीन अपडेट देत असते. व्हॉट्सअँँप अशाच काहीसा नवीन अपडेट देण्याचा विचारात आहे.

आता व्हॉट्सअँँपवर लवकरच बुमरँग (Boomerang) सारखे फीचर व्हॉट्सअँँप युझर्संना मिळण्याची शक्यता आहे. व्हिडीओ प्रस्तुतीचे बुमरँग नावाचे फीचर सध्या इंस्टाग्रामवर दिले गेले आहे. वेगवेगळे शॉर्ट व्हिडीओ बनविण्यासाठी या फीचरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

सुत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार या नव्या फीचरचे अपडेट लवकरच व्हॉट्सअँँपवर येऊ शकते. बुमरँग फीचर Gif फाईलमध्ये व्हिडीओ बनवण्याच्या पर्यायासह येण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअँँपवर बुमरँगसाठी 7 सेकंदाची मर्यादा असू शकते. व्हॉट्सअँँपच्या एका अकाऊंटवरून यापूर्वी अनेक स्मार्टफोनमध्ये वापरासंदर्भातील अपडेट येणार असल्याची देखील माहिती मिळाली होती.

यामुळे वापरकर्त्याला एका नंबरवरूनच दोन किंवा अधिक स्मार्टफोनवर व्हॉट्सअँँप चालवता येणार आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअँँपची चॅट हिस्ट्री देखील या दोन्ही डिव्हाईसमध्ये कनेक्ट होणार आहे. व्हॉट्सअँँपच्या वेब व्हर्जनमध्ये या नव्या फीचरमुळे काहीही परिणाम होणार नसल्याचे देखील स्पष्ट आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!