Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

#केंद्रीयअर्थसंकल्प२०१९ : युवकांसाठी ‘या’ अर्थसंकल्पात काय ? जाणून घ्या #Live

Share

नवी दिल्ली : लोकसभेत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात झाली असून पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडत आहेत. दरम्यान लोकसभेत ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सुरवात झाली असून या अर्थसंकल्पात कुणासाठी काय तरतुदी आहेत. हे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या आहेत अर्थसंकल्पातील काही घोषणा :

#केंद्रीयअर्थसंकल्प२०१९ :

 • शेतकऱ्यांचे १० हजार उत्पादक संघ स्थापन करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील
 • जलशक्ती मंत्रालयाची स्थापना; प्रत्येकाला स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रयत्नशील
 • पारंपारिक उद्योगांना चालना देणार,अन्नदाता आता उर्जादाता होणार
 • युवकांना स्किल इंडियाद्वारा प्रशिक्षित केले जातील
 • उच्च शिक्षण विकास संस्थांसाठी ४०० कोटींची तरतूद
 • १ कोटी युवांना प्रधानमंत्री कौशल्य योजनेअंतर्गत सक्षम बनवले
 • युवांसाठी – संशोधन आणि नवकल्पनांना जोर देऊन जास्तीत फोकस करेल
 • युवांसाठी – सरकार नवीन शिक्षण प्रणाली आणणार आहे
 • शेअर बाजारात तेजी, निर्देशांक 40 हजार पार
 • आतापर्यंत २ कोटी ग्रामीणांना साक्षर बनविण्यात यश 
 • ई-नाम साठी राज्य सरकारशी संयुक्तपणे काम करणार
 • देशामध्ये पारंपारिक उद्योगांना चालना देणार. त्यांना प्रमोट केले जाईल
 • स्टॅन्ड अप इंडिया पुढील 5 वर्षही सुरू राहणार
 • खेलो इंडिया स्कीम अंतर्गत राष्ट्रीय स्तराचे खेळाडू बनवले जाणार

2019-20 साठी देशाचा आर्थिक विकास दर (GDP) 7 टक्के असू शकतो. असं आर्थिक सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आलं आहे. आर्थिक सर्वेत परदेशी गुंतवणूक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


महाराष्ट्रात आगामी काही महिन्यातच विधानसभा निवडणूका असल्याने आता शेतकरी, पाणीसंकट, सामान्य नोकरदार आणि उद्योजकांसाठी खास घोषणा होण्याची शक्यता आहे. करदात्यांना सवलत मिळू शकते. त्यामुळे सामान्यांचेही आजच्या अर्थसंकल्पाकडे डोळे लागून राहिले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!