Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये प्रथमच तिरंगा फडकविणार

Share

मुंबई : उद्या देशभरात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच काश्मीरमध्ये तिरंगा फडकविणार आहेत. दरम्यान नुकतेच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यानंतर प्रथमच अशा पद्धतीने ऐतिहासिक पाऊल उचलणार आहे.

दरम्यान ७२ व्या स्वातंत्र्यदिनी श्रीनगरच्या लालचौकात ध्वजारोहण केले जाणार असल्याची चर्चा आहे. भारताच्या १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शहा श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात गृहमंत्रालयाकडून अद्याप माहिती मिळाली नाही.

महत्वाची बाब म्हणजे काश्मीर भारतात सामील झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वप्रथम १९४८ मध्ये लाल चौकात तिरंगा फडकविला होता. त्यानंतर या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कलम ३७० लागू झाल्यानंतर काश्मीरला वेगळा झेंडा मिळाला होता. परंतु आता ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच या ठिकाणी तिरंगा फडकविण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!