Type to search

Breaking News टेक्नोदूत देश विदेश मुख्य बातम्या

व्हॉट्सऍप हेरगिरी प्रकरणी ट्विटर वादात

Share

नवी दिल्ली : व्हॉट्सऍप हेरगिरी प्रकरणी ट्विटर कंपनीही वादात सापडली असून ट्विटरच्या दोन कर्मचाऱ्यांनी सौदी अरेबियाला महत्त्वाची माहिती पुरविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान देशभरात निवडणुकीच्या काळात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक यांच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये हेरगिरी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याचप्रमाणे ट्विटरच्या दोन कर्मचाऱ्यांनी अमेरिकेत सौदी अरेबियासाठी हेरगिरी केली आहे. कर्मचाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती प्राप्त केल्यावर संशयितांनी ती सौदी अरेबियाला पुरविली आहे. त्यामुळे याबाबत कारवाई करणार असल्याचे दिसत आहे.

अहमद अबुउआमो आणि अली अलजबरा अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ट्विटरच्या हेरगिरीप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अहमद उबुउआमो हा अमेरिकेचा रहिवासी असून त्याने तीन वापरकर्त्यांची हेरगिरी केल्याचा आरोप आहे. तसेच त्याच्यावर तपासात अडथळा आणल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे.

या पूर्ण प्रकरणात सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचा एक सहकारी सामील असल्याचा संशय आहे. पत्रकार जमाल खशोगी यांची इस्तंबूलच्या सौदी अरेबियाच्या दूतावासात हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हे हेरगिरी प्रकरण समोर आल्याने नवा वाद उभा ठाकला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!