Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिल्लीतील टाईम स्लॅाटचा प्रश्न मार्गी; येत्या २५ सप्टेंबरपासून नाशिक दिल्ली विमानसेवा होणार पूर्ववत

Share

नाशिक । प्रतिनिधी

नागरी उड्डाण मंत्रालयाद्वारे दिल्ली विमानतळावरील टाईम स्लॅाट उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक दिल्ली विमानसेवेचा अडसर दूर झाला आहे. लवकरच नाशिक दिल्ली विमानसेवेला प्रारंभ होणार असल्यामुळे  नाशिककरांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होण्यासाठी दिल्लीतील स्लॉट हा मोठा अडसर होता. याबाबत विमान प्राधिकरणाने सकारात्मक निर्णय घेत स्लॉट उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या 25 सप्टेंबर पासून दिल्ली नाशिक विमान सेवा सुरू होणार असून, नाशिक शहर देशाच्या राजधानीसह जगाशी जोडले जाणार आहे.

विमान प्राधिकरणाने इंडीगो कंपनीला टाईम स्लॉटला लवकरच मान्यता मिळणार असल्याचे पत्र धाडले आहे. यामुळे नाशिक दिल्ली विमान सेवा नियोजित 25 सप्टेंबर पासुन नियमित सुरू करण्याचे संकेतच याद्वारे मिळाले आहेत.

जेट एअरवेज आर्थिक अडगळीत अडकल्यानंतर नाशिक दिल्ली विमानसेवा ठप्प झाली. त्यानंतर नाशिकचे खा.हेमंत गोडसे यांनी विमानसेवा सुरु होण्यासाठी सातत्याने पाठपूरावा केला. नाशिक जिल्हयाच्या विकासासाठी नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू व्हावी म्हणून खासदार गोडसे हे नागरी उड्डाण मंत्रालयाला पटवून दिले.

खा. गोडसे यांच्या आग्रही मागणीची दखल घेत मागील महिन्यात उडाण मंत्रालयाने उडाण योजनेअंतर्गत नाशिक- दिल्ली हवाई सेवा सुरू करण्यास इंडिगो कंपनीला परवानगी दिली होती. त्यानंतर इंडिगो कंपनीने दिल्ली विमानतळावर टाईम स्लॉट मिळण्याकामी उडाण मंत्रालयाकडे प्रयत्न सुरू केले होते. अखेर आज टाईम स्लॉट देण्याबाबत इंडिगोला पत्राद्वारे कळविल्यानंतर   गेल्या साडेतीन महिन्यापासून ठप्प असलेली विमानसेवा पूर्ववत होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!