Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

जगातली सर्वोच्च उंचीवरची लद्दाख मॅरेथॉन संपन्न

Share

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरच्या लेह या शहरात जगातली सर्वोच्च उंचीवरची धावशर्यत म्हणून ओळख असलेल्या ‘लद्दाख मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली होती. लडाख मॅरेथॉनची ही आठवी आवृत्ती होती.

या कार्यक्रमात भारताच्या विविध भागातून आणि २५ परदेशांमधून ६ हजाराहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. हा कार्यक्रम लद्दाख ऑटोनोमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्याद्वारे प्रायोजित होता.

मॅरेथॉन समुद्रसपाटीपासून ११ हजार फूटांहून अधिक उंचीवर आयोजित केले जाते. ही जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते.हा कार्यक्रम चार वर्गांमध्ये विभागला जातो; ते आहेत, ७२ किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज, ४२ किलोमीटर फूल मॅरेथॉन आणि २१ किलोमीटर हाल्फ मॅरेथॉन आणि ७ किलोमीटर रन फॉर फन. ही मॅरेथॉन प्रथम २०१२ मध्ये आयोजित करण्यात आली होती. तसेच या मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे.

दरम्यान या स्पर्धेचे विजेते
७२ किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज – शबीर हुसेन (पुरुष), क्रिस्टीना वॉल्टर (आयर्लंड)
४२ किलोमीटर फूल मॅरेथॉन – जिग्मेट डोल्मा (महिला) (सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान), शबीर हुसेन (पुरुष)
हाफ मॅरेथॉन (महिला) – ताशी लाडोल

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!