Type to search

क्रीडा

Video : महिला क्रिकेटच्या सामन्यात टिपला अप्रतिम झेल

Share

नवी दिल्ली : क्रिकेटच्या सामन्यात कधी कोणता विक्रम होईल सांगता येत नाही. नुकतीच एक महिला क्रिकेटच्या सामन्यात अप्रतिम झेल टिपण्यात आला आहे. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामधील महिलांच्या सामन्यात हा विशेष झेल टिपला गेला. न्यूझीलंडचा महिला संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी न्यूझीलंडची केटी पेरकिन्स ही चार धावांवर फलंदाजी करत होती. तिने हिथर ग्रॅहम हिच्या गोलंदाजीवर सरळ फटका खेळला.


हा चेंडू थेट नॉन स्ट्राइकला असलेल्या मार्टिनच्या बॅटवर आदळला आणि चेंडू उडाला. त्यानंतर तो चेंडूला गोलंदाज ग्रॅहमने झेलला आणि झेलबाद झाल्याचे अपील केले. तिसऱ्या पंचांनी घटना नीट पाहून आणि त्याचा अभ्यास करून लगेचच पेरकिन्सला बाद ठरवले. दरम्यान, पंचांनीही दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हा प्रकार खिलाडूवृत्तीने स्वीकारला याबाबत त्यांचे कौतुक केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!