Type to search

Breaking News टेक्नोदूत देश विदेश मुख्य बातम्या

२२ नोव्हेंबरपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती बंद

Share

 नवी दिल्ली : सोशल मीडियावरील महत्वाची सोशल वेबसाइट्वरूल लवकरच राजकीय जाहिराती हद्दपार होणार असल्याची माहिती ट्विटर सीईओ जॅक डॉर्सी यांनी ट्विटरद्वारेच दिली आहे . येत्या २२ नोव्हेंबरपासून ट्विटर या प्रसिद्ध सोशल मीडिया वेबसाइटवरून राजकीय जाहिराती बंद केल्या जाणार आहेत. याची सर्व माहिती व नियम १५ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान नुकत्याच विधानसभा निवडणूक पार पडल्या. यामध्ये प्रचारासाठी अनेक पक्षांनी ट्विटरचा वापर केला . या अनुषंगाने ट्विटरने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. उमेदवार जाहिराती आणि समस्यांच्या जाहिराती बंद होणार असून मतदानास प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती सुरू राहणार आहेत. सोशल मीडियावरील जाहिरातींचा वापर लोकांच्या मतावर किंवा निवडीवर प्रभाव टाकून ध्रुवीकरण करणाऱ्या ठरत असल्या कारणाने हा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच फेसबुक संस्थापक मार्क झकरबर्ग यांना अमेरिकन संसदेत यासंबंधीत विषयावरूनच प्रश्नोत्तरे करण्यात आली होती. यावेळी एलेक्जांड्रिया ओकॅशिओ कोर्टेज यांनी फेसबुकच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं. अशावेळी ट्विटरने सरसकट सगळ्याच राजकीय जाहिराती काढून टाकण्याचा निर्णय नक्कीच धाडसी आहे.

या प्रकारच्या राजकीय जाहिराती बंद केल्यामुळे विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना टार्गेट करून त्यानुसार जाहिराती बनवून त्यासाठी मोठी रक्कम मोजून यूजर्सना स्वतःकडे वळवलं जात असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. एकंदर सामाजिक व्यवस्थेसाठी ही गोष्ट नक्कीच चांगली नाही. Paying for reach म्हणजे एखादा राजकीय संदेश अशा जाहिरातीद्वारे वारंवार दाखवून युजर्स थोपवला जातो आणि पसरला जातो.

त्यामध्ये अकाऊंट फॉलो करणे किंवा रिट्विट केलं की पेईंग फॉर रीच पूर्ण झालं. इंटरनेटवरील जाहिरातींद्वारे लाखों लोकांपर्यंत काही क्षणात पोहोचता येत असलं तरी यामुळे लोकांच्या वैयक्तिक मतांवर प्रभाव पडत आहे आणि त्यामुळे अप्रत्यक्षरित्या इतर लाखो लोकांच्या आयुष्यवरही फरक पडतो. ट्विटरने हा निर्णय २०२० च्या अमेरिकन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला असला तरी भारतातसुद्धा याचा नक्की सकारात्मक परिणाम दिसून येईल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!