Type to search

‘ढाई किलो का हात’चा भाजपमध्ये प्रवेश; गुरुदासपूर मधून तिकीट ?

देश विदेश

‘ढाई किलो का हात’चा भाजपमध्ये प्रवेश; गुरुदासपूर मधून तिकीट ?

Share

नवी दिल्ली : सध्या बॉलीवूडच्या अनेक दिग्गजांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांत प्रवेश केला आहे. नुकतीच अभिनेता सानी देओलने देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशावेळी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची उपस्थिती होती.

दरम्यान सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा व सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सनी देओल यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपशी जोडले गेलेले आहेत. त्यांनी 2004 मध्ये भाजपच्या तिकिटावर राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!