Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

नव्या रणनीतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कॅबिनेट बैठक

Share

नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा मोदी यांना जनतेने बहुमताने जिंकून देत ऐतिहासिक विजय युतीने मिळविला आहे. त्यामुळे कल (दि. २३) लागलेल्या निकालानंतर लागलीच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आभरसभा घेत जनतेला धन्यवाद दिले.

नवे सरकार स्थापन होण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घेणार असून पुढील पाच वर्षाच्या कामाची रणनिती ठरविणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान सर्व स्तरातून नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळलेजात आहेत. सोशलमिडीया व इतर माध्यमावर मोदी तसेच भाजपला शुभेच्छा देण्याचा ओघ सुरु आहे. अशातच अमित शहा यांनी कॅबिनेट बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद सुद्धा उपस्थिती लावणार आहेत. तत्पूर्वी नरेंद्र मोदी आज आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा रामनाथ कोविंद यांच्याकडे सोपवणार आहेत.

तर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी यांना पंतप्रधान पद देण्यात आल्यानंतर २६ मे रोजी त्यांनी शपथ घेतली होती. मात्र यंदासुद्धा २६ मे रोजी पुन्हा शपथ घेणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!