Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला पंतप्रधानपदाची शपथ घेणार

Share

नवी दिल्ली : अखेर नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा होईल. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीदेखील याचवेळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

आज (दि. २६) सायंकाळी राष्ट्रपती भवनाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. तत्पूर्वी शुक्रवारी मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रपतींकडे राजीनामे सुपूर्द केले.

मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत ३०३ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३५३ जागा मिळाल्या आहेत. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला मंत्रीपद मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!