Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

जम्मू काश्मीरमध्ये फोन कॉल्स आणि इंटरनेट सेवा सुरू

Share

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये लागू केलेले निर्बंध हटविण्यास सुरुवात झाली असून नुकतीच दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा चालू करण्यात आली आहे. दरम्यान कलम ३७० रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ती पूर्वरत झाली असून शाळा महाविद्यालये देखील सुरु करण्यात आली आहेत.

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर ५ ऑगस्टपासून ते १६ ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी दूरध्वनी तसेच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे येथील जनजीवन दहशतीच्या सावटाखाली वावरत होते. तसेच येथील शाळा, महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्या होत्या.

या ठिकाणी इंटरनेट यासाठी बंद करण्यात आले होते कारण, पाकिस्तानकडून इंटरनेटचा वापर करून अफवा पसरवल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच दहशतवाद्यांकडूनही घातपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी बाळगली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!