Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

आधारकार्ड धारकांनो सावधान; ‘ही’ चूक केल्यास मोजावा लागणार दहा हजाराचा दंड

Share
दहा वर्षात १२५ कोटी आधारनोंदणी, 125 crore adhar card registration completed in last ten years

नवी दिल्ली : देशभरात आधार असणे सक्तीचे केले असून आता यामध्ये आणखी महत्वाचा बदल झाला आहे. जर टॅक्स जमा करताना आधार नंबर चुकीचा दिल्यास १० हजार रुपयाचा दंड भरावा लागणार आहे.

दरम्यान आधारकार्डला पॅनकार्ड लिंक केल्यानंतर इनकम टक्स भरण्यासाठी प्राप्तीकर विभागाने पॅन नंबरच्या ठिकाणी १२ अंकी आधार नंबर वापरण्यास परवानगी दिली आहे. परंतु असे करताना ग्राहकांना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण संबंधीत ग्राहकाचा टॅक्स जमा करताना आधार नंबर चुकीचा दिल्यास १० हजार रुपयाचा दंड भरावा लावू शकतो. त्यामुळे वेळीच सर्व करदात्यांनी यासंदर्भात काळजी घेणं आवश्यक आहे.

नव्या नियमानुसार इतकं टॅक्स १९६१ च्या नियमानूसार केवळ पॅन कार्डच्या ठिकाणी आधार नंबर वापरण्यास परवानगी दिली आहे. सध्या सादर केलेला नवीन नियम हा ज्या ठिकाणी पॅनच्या ठिकाणी आधारचा वापर केला जातो.

त्याच ठिकाणी चुकीच्या आधार नंबरच्या बदल्यात १० हजार रुपयाचा दंड लागू करणार आहे. प्राप्तिकर रिटर्न, बँक खाते उघडणे, डीमॅट खाते उघडणे आणि ५० हजार रुपयाहून अधिक म्युच्युअल फंड आणि बॉण्ड खरेदी या ठिकाणी ही दंड आकारणी करण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!