Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

धक्कादायक! दिल्लीकरांसाठी आता ‘ऑक्सिजन बार’; २९९ रुपयांत १५ मिनिटे

Share

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या पातळीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे दिल्लीकर हैराण झाले असून यासाठी मास्क, एअर-क्लीनर इतकच नाही तर महाग एअर प्यूरिफायरने देखील, विषारी हवेपासून वाचण्यासाठी वापरले जात आहेत. अशा परिस्थितीत बाजारामध्ये आता ‘ऑक्सी प्यूअर’ नावाचा एक ऑक्सिजन बार उघडला गेला आहे. इथे १५ मिनिटांच्या सुगंधी ऑक्सिजनसाठी ग्राहकांना २९९ ते ४९९ रुपये दर आकारण्यात येत आहे.

गेली पंधरा दिवसांपासून शहराला प्रदूषणाने घेरले आहे. पंजाब आणि हरियाणा भागातील तापमानात घट आणि गारपिटीच्या घटनेनंतर दिल्लीतील एक्यूआय आणखी तीव्र झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहराला गॅस चेंबर म्हटले आहे. त्यामुळे या वायू प्रदूषणाच्या संकटाशी झुंज देण्यासाठी शहरात एक नवी संकलपना उदयास आली आहे. ती म्हणजे ऑक्सिजन बार होय.

‘ऑक्सी प्यूर’ नावाचा बार यावर्षी मी मध्ये दिल्लीत सुरु करण्यात आला. आर्यवीर कुमार यांनी दिल्ली येथील साकेत या ठिकाणी हा बार उघडला आहे. या ठिकाणी ग्राहकांना पंधरा मिनिटांसाठी शुद्ध ऑक्सिजन दिले जाते. तसेच सात वेगववेगळ्या फ्लेवर मध्ये ऑक्सिजनची निवड करू शकता. यामध्ये स्पायर्मिंट, पेपरमिंट, दालचिनी, केशरी, लिंब्रास्रास, निलगिरी आणि लैव्हेंडर फ्लेवर्स उपलब्ध आहेत.

दरम्यान, दिल्लीतील वाढते प्रदूषण पाहता शहरातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहून स्वच्छ हवा प्रदान करण्याचे आवाहन केले. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने धोकादायक हवेच्या गुणवत्तेचे कारण देत शाळा बंद ठेवण्याची शिफारस केली होती. यामुळे गुरुवारी व शुक्रवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

‘ऑक्सिजन बार’ नक्की काय?
ऑक्सि प्योर हा बार मे २०१९मध्ये आर्यवीर कुमार यांनी लॉंच केला. या जागेवर फक्त शुद्ध ऑक्सिजन मिळतो. या जागेची खासियत म्हणजे या जागेवर ७ वेगवेगळ्या सुगंधात ऑक्सिजन उपलब्ध आहे. गवती चहा, संत्र, दालचिनी, लव्हेंडर, निलगिरी आणि पुदिना या फ्लेव्हरमध्ये सुद्ध ऑक्सिजन इथे मिळेल. ऑक्सि प्योरच्या स्टाफ हेडच्या सांगण्या प्रमाणे, ग्राहकाला एक ट्यूब देण्यात येते आणि त्यांना ट्यूबमधून शुद्ध ऑक्सिजनचा श्वास घ्यावा लागतो. हा ऑक्सिजन शरीराला ऊर्जा देतो आणि त्याशिवाय मनाला देखील शांत करतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!