Type to search

देश विदेश

असाध्य आजारांशी लढण्याच्या नव्या संशोधनाला नोबेल

Share

नवी दिल्ली : शरीरातील ऑक्सिजन मात्रेतील बदल ओळखून त्यानुसार प्रतिसाद देण्याचे पेशींचे कार्य कसे चालते, हे सिद्ध करून कर्करोग, रक्तक्षय, हृदयविकार यांसह अनेक असाध्य आजारांवर उपचार करण्याचा नवा मार्ग दाखवणाऱ्या संशोधनाला वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

जगातील हे सर्वोच्च पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना विभागून जाहीर करण्यात आले. त्यापैकी डॉ. विल्यम जी. केलीन ज्युनियर आणि सर पीटर जे. रॅटक्लिफ हे अमेरिकी, तर ग्रेग एल. सेमेन्झा हे ब्रिटिश आहेत. सुमारे ९ दशलक्ष क्रोनर म्हणजे नऊ लाख १८ हजार अमेरिकी डॉलर असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

पण जिवंत राहण्याची पेशीप्रक्रिया कशी चालते याबद्दलच्या आमच्या ज्ञानात या संशोधनाने मोलाची भर घातली आहे,’’ अशा शब्दांत नोबेल समितीने तिन्ही संशोधकांच्या या क्रांतिकारी संशोधनाचा गौरव केला. शरीरातील बदलत्या ऑक्सिजन मात्रेला प्रतिसाद देण्याची जनुकांची क्रिया नियमित करणारी ‘जीवशास्त्रीय यंत्रणा’च या संशोधकांनी शोधली आहे, असे गौरवोद्गारही नोबेल समितीने काढले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!