Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी’; मोदींच्या दुसऱ्या पर्वाला सुरवात

Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात झाली.

यात सर्वप्रथम राजनाथ सिंह आणि त्यानंतर अमित शहा, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, नरेनसिंग तोमर, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, थावरचंद गेहलोत, सुब्रमण्यम जयशंकर, रमेश पोखरीवाल, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नक्वी, प्रल्हाद जोशी, महेंद्रनाथ पांडे, अरविंद सावंत, गिरीराज सिंग, राजेंद्रसिंग शेखावत, संतोषकुमार गंगवार, राव इंद्रजित सिंह, श्रीपाद नाईक, जितेंद्र सिंह, किरण रिजिजू, प्रल्हाद पटेल, आर के सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मांडवी,य फगणसिंह कुलसते, अश्विनकुमार चौबे, अर्जुन मेघवाल, व्ही के सिंह, कृष्णपाल गुजल, रावसाहेब दानवे, किशन रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला, रामदास आठवले, साध्वी निरंजन ज्योती, बाबुल सुप्रियो, संजीवकुमार बलियान, संजय धोत्रे, सुरेंद्र अगंडी,
नित्यानंद आय, रतनलाल कटारिया, रेणुका सिंह, सोमप्रकाश, महेश रामेश्वर तेलीम, प्रतापसिंह सालंकी, कैलास चौधरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान आज सकाळपासून या सोहळ्याची जय्यत तयारी चालू होती. या सोहळ्यासाठी सहा हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सायंकाळी उद्धव ठाकरेंसह गिरीश महाजन देखील या सोहळ्यास उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील या कॅबिनेटमध्ये सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा समावेश नसून त्यांनी आधीच पत्राद्वारे मंत्रिपद नको असल्याचे स्पष्ट केले आहे. जेटली उपचारासाठी परदेशात असून सुषमा स्वराज यांनी शपथविधी समारंभाला उपस्थिती लावली.

मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात राजकारण, उद्योग, बॉलिवूड आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींसह परदेशातील नेत्यांनीही उपस्थिती लावली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!