नवी दिल्ली : #Moody : ‘मूडीज’कडून भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा

0

‘मूडीज’ने भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे.

विशेष म्हणजे 13 वर्षांनंतर मूडीजने भारताच्या मानांकनात सुधारणा केली आहे.

मूडीजने भारताचे क्रेडिट रेटिंग ‘Baa3’ वरुन ‘Baa2’ केले आहे. भारत सरकारने लागू केलेल्या जीएसटी, आधार संलग्नता आणि विविध लाभांचे पैसे थेट खात्यात जमा करणे अशी विविध महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याने ‘मूडीज्’ने हा निर्णय घेतला आहे.

या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत ही सुधारणार आहे.

 “भारत सरकारने उचललेल्या पावलांमुळे अंतर्गत व परदेशी गुंतवणूक वाढेल, शाश्वत व भक्कम वाढीस प्राधान्य मिळेल, व्यवसायात चांगली स्थिती निर्माण होईल. वृद्धीची आणि विविध धक्के पचवण्याची क्षमता वाढवणे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता वाढण्यास या सुधारणांचा फायदा होईल” असे ‘मूडीज्’ने  प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*