Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

उद्या चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार

Share

नवी दिल्ली : भारताच्या मिशन चांद्रयान-२ उद्या (दि.१५) पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-3 च्या मदतीने अवकाशात झेपवणार आहे.

दरम्यान लॉन्चिंग नंतर ५२ दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. इस्रोच्या या महत्त्वकांशी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे. चांद्रयान -१ नंतर १० वर्षांनी इस्रोची ही चांद्रयान मोहीम होणार आहे.

चांद्रयान-२ ची काही खास वैशिष्ट्ये असून त्यामध्ये चांद्रयान-२ एकूण १२ भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे. यानाचे वजन ३. ८ टन इतके असून ते आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे. तसेच हे यान चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहीम झालेली नाही.

यात १३ भारतीय पेलोड असतील त्यातील ८ ऑर्बिटर, ३ लँडर आणि २ रोव्हर असतील. याशिवाय नासाचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!