Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

लोकसभा निवडणूक २०१९ : पहिल्या फेरीनंतरचा देशभरातील कल; मोदी आघाडीवर, राहुल गांधी पिछाडीवर

Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया ११ एप्रिल रोजी सुरू झाली आणि सात टप्प्यांमध्ये मतदान होऊन १९ मे रोजी संपली. यावेळी अपक्षांसह विविध पक्षांचे आठ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या सर्वांचे भवितव्य गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत निश्चित होईल.

दरम्यान देशभरात निकालाबाबत उत्सुकता असून पहिल्या फेरीच्या निकालानंतर युतीचा पारडे जाड झाल्याचे दिसून येत आहे. देशभरातील जागांचा कल पुढीलप्रमाणे

उत्तर प्रदेशात भाजपा ५३ जागांवर आघाडीवर
उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७२ जागांचे कल हाती आली आहेत. यात बहुजन समाज पक्ष – ११, भाजपा- ५३, काँग्रेस – १ आणि समाजवादी पक्ष ७ जागांवर आघाडीवर आहेत.

अमित शाह २५ हजार मतांनी आघाडीवर
सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शाह २५ हजार मतांनी आघाडीवर

नरेंद्र मोदी आघाडीवर
वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर

मनेका गांधी पिछाडीवर
भाजपा उमेदवार आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी या सुलतानपूर मतदारसंघातून पिछाडीवर तर वरुण गांधी पीलीभीत येथून भाजपा आघाडीवर, सोनिया गांधी रायबरेलीतून आघाडीवर

गौतम गंभीर आघाडीवर
दिल्ली पूर्व या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार गौतम गंभीर आघाडीवर, या मतदारसंघात काँग्रेसकडून अरविंदर सिंग लव्हली आणि आम आदमी पक्षातर्फे आतिशी मार्लेना या रिंगणात आहेत.

पश्चिम बंगालमध्ये भाजपा ९ जागांवर आघाडीवर
पश्चिम बंगालमधील ४२ पैकी १५ जागांचे कल हाती आले असून यातील सहा जागांवर तृणमूल काँग्रेस तर ९ जागांवर भाजपा आघाडीवर

कन्हैया कुमार पिछाडीवर
बिहारमधील बेगुसराय या मतदारसंघात गिरीराज सिंह हे आघाडीवर असून या मतदारसंघात डाव्या पक्षांकडून कन्हैया कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

स्मृती इराणी ५६०० मतांनी आघाडीवर
अमेठीमधून स्मृती इराणी या ५६०० मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून पिछाडीवर तर वायनाडमधून दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत.

राजनाथ सिंह आघाडीवर
तिसऱ्या फेरीअखेर लखनऊमधून भाजपाचे राजनाथ सिंह आघाडीवर आहेत

साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आघाडीवर
भोपाळ मतदार संघातून भाजपाच्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर तीन हजार मतांनी आघाडीवर

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आज (23 मे) देशातील सर्व जनतेला कोणाची सत्ता येणार याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच सकाळी ०८ वाजल्यापासून मतदान मोजणी सुरु झाली आहे. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार यंदासुद्धा मोदी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आज जाहीर होणाऱ्या अंतिम निकालानंतर नेमकी कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. तसेच यंदा भारताचे नवे पंतप्रधान कोण होणार याची सुद्धा उत्सुकता अवघ्या देशाला लागून राहिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!