Type to search

नवी दिल्ली : २५ व्या वर्षी सेटल होता होता ‘ती’ झाली खासदार

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

नवी दिल्ली : २५ व्या वर्षी सेटल होता होता ‘ती’ झाली खासदार

Share

नवी दिल्ली : लोकसभेचा निकालानंतर अनेक वेगवेगळे पैलू उलगडण्यास सुरवात झाली. त्यातच सर्वाधिक खासदार म्हणून ७८ महिला संसदेत पाय रोवणार आहे. यात आणखी एक विशेष उल्लेखनीय घटना म्हणजे सर्वात तरुण खासदार होण्याचा मान चंद्राणी मुर्मू यांनी मिळवला आहे. सध्या सोशल मीडियात त्यांच्या नावाची चर्चा आहे.

चंद्राणी मुर्मू यांनी केंजर या मतदारसंघातून बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षाकडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. दरम्यान चंद्राणी मुर्मू यांच्या बाबतीत आणखी एक सत्य समोर आले आहे कि, चंद्राणी मुर्मू खासदार होण्यापूर्वी नोकरी शोधत होत्या. या दरम्यान लोकसभेचा बिगुल वाजला. त्यावेळी त्या नोकरीच्या शोधात होत्या.

मात्र त्यांना नोकरी मिळाली नाही. लोकसभेला बीजेडीने त्यांना तिकीट दिले आणि चंद्राणी या भरघोस मतांनी निवडून आल्या. इतकेच नाही तर देशातील सर्वात तरुण खासदार होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.

चंद्राणी यांचे वय २५ वर्ष ११ महिने पूर्ण आहे. तसेच त्यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. चंद्राणी यांनी कधीच खासदार होण्याचा विचार केला नव्हता. त्या शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात होत्या. मात्र केंजरमधील लोकसभेची जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होती. बीजेडीने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली.

या मतदारसंघातून चंद्राणी विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या अनंत नायक यांचा ६७ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आहे. नायक हे या मतदारसंघातून दोनदा विजयी झाले होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!