लोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’

0

नवी दिल्ली : सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु असून प्रचाराचा वेग वाढला आहे. एकीकडे उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी हटके प्रचार तंत्र वापरत आहे तर नागरिकांमध्ये मतदान करण्यासाठी जागृतता निर्माण करण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.

अशातच उन्हाने कहर केला असला तरी कार्यकर्त्यांची चंगळ आहे. कारण दिल्लीच्या कनॉट पॅलेस परिसरामध्ये Ardor 2.1 या हॉटेलमध्ये खास इलेक्शन थाळी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये २८ राज्यातील २८ खास पदार्थांची लज्जत एकाच वेळी चाखण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. सध्या सोशल मीडियामध्ये या थाळीचे फोटो व्हायरल होत आहे.

दरम्यान देशात निवडणुकांची रेलचेल असली तरी या बरोबर या इलेक्शन थाळीचीही जोरदार चर्चा सुरु आहे. भारताच्या नकाशाच्या आकाराची असणारी डिश असून यामध्ये ग्राहकांना २८ राज्यातले २८ विविध पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा वडापाव, गुजरातचा ढोकळा ते बंगालचा राजभोग पासून गोवन फिश करी सारख्या चमचमीत पदार्थांची रेलचेल आहे.

शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन विविध प्रकारामध्ये ही थाळी उपलब्ध आहे. इलेक्शन स्पेशल थाळीचं वजन सुमारे सडे पाच किलोग्रॅम असून त्यामध्ये अंदाजे दहा किलो वजनाच जेवण नियमित वाढलं जाते. भारताच्या नकाशाच्या आकारातील थाळी आणि राज्याच्या नेमक्या ठिकाणावर तेथील खास पदार्थ वाढला जात असल्याने लोकांमध्ये या थाळीची खास क्रेझ आहे.

इलेक्शन थाळीची किंमत व्हेज थाळी – १९९९+ टॅक्स आणि नॉन व्हेज थाळी २२९९ + टॅक्स इतक्या रूपयांमध्ये उपलब्ध आहे. भारतात सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिवशी त्या विशिष्ट राज्यातील पदार्थ मोफत उपलब्ध करून दिले जातात. मग वाट कसली बघताय दिल्लीत असला तर लागलीच या हॉटेलला भेट देऊन हि स्पेशल इलेक्शन थाळीचा आस्वाद घेऊ शकता.

LEAVE A REPLY

*