Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

इतिहासात प्रथमच लोकसभेत सर्वाधिक महिला खासदार

Share

नवी दिल्ली : सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या संपूर्ण बहुमताने नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेवर येणार आहेत. या लोकसभेत प्रथमच सर्वपक्ष मिळून ७८ महिला खासदार यावेळी विजयी झाल्या आहेत. यामुळेच लोकसभेत स्त्री शक्ती मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे.

यंदाच्या लोकसभेत सर्वाधिक महिला निवडून आल्या असून त्यामुळे संसदेत महाराज दिसून येणार आहे. फक्त भाजपाच नाही सगळ्याच पक्षाच्या मिळून एकूण ७८ महिला संसदेत पॉल टाकणार आहे. १९५२ मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर प्रथमच महिला वर्ग एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच निवडून आला आहे. यावेळी म्हणजेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासह विविध पक्षाच्या ७८ महिला खासदार निवडून आल्या आहेत.

देशभरातून एकूण ७२४ महिला उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यापैकी भाजपासह विविध पक्षाच्या ७८ महिला जिंकल्या. उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल मधून सर्वाधिक महिला विजयी झाल्या आहेत. तसेच काँग्रेस पक्षाकडून सर्वाधिक म्हणजेच ५४ महिला उमेदवार निवडणुकीला उभ्या होत्या तर भाजपकडून ५३ महिला उभ्या होत्या. सोनिया गांधी, हेमा मालिनी, किरण खेर या महिला खासदारांनी त्यांची जागा राखत पुन्हा एकदा विजय मिळवला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!