Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकात दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोघांनी पुढील तयारीसाठी विशेष बैठक बोलावली होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांनी दिल्ली येथे अचानक भेट घेतली. परंतु अद्याप काहीही माहिती मिळालेली नसून आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत असतील राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस मध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली होती. परंतु काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा न देण्याबाबत विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान प्रियांका गांधी वगळता काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यास राहुल गांधी यांनी भेट दिलेली नाही. त्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी पवार यांची अचानक भेट घेतली.

लोकसभा निवडणूक २०१९ नंतर भारतीय राजकारण पूर्णतः ढवळून निघाले आहे. २०१४ नांतर भाजपने पुन्हा एकदा मतांच्या जोरावर सत्ता हासील केली आहे. तर, त्या उलट राष्ट्रीय काँग्रेस सपशेल पराभूत झाली. पार्श्वभूमिवर भाजपला रोखण्यासाठी आणि काँग्रेसचे संसदेतील स्थान कायम ठेवण्यासाठी काँग्रेसच्या गोटात जोरदार विचारमंथन सुरु आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीनंतर राहूल गांधी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचीही भेट घेणार आहेत. स्वपक्षातील नेत्यांना भेटी नाकारत पवार यांची भेट घेण्यामागे दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा असल्याचेही सांगितले जात आहे. अधिकृत सूत्रांनी अजून या माहितीस दुजोरा दिला नसून सर्व चर्चा या प्राथमिक माहितीवर आधारित आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!