जेएनयूमध्ये अभाविपला धूळ चारत डावी आघाडी विजयी

0

नवी दिल्ली : सर्वांचं लक्ष लागून असलेल्या जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये (जेएनयूएसयू) डाव्या युतीच्या विद्यार्थ्यांनी पताका फडकावली आहे. यामध्ये काही जागा या डाव्या युतीने पटकावल्या आहेत. जेएनयूएसयूच्या अध्यक्ष पदावर डाव्या विद्यार्थी संघाच्या एन. साई बालाजीने अभाविच्या ललित पांडेचा १०७३ मतांनी पराभव केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर बापसा विद्यार्थी संघ आहे. जेएनयूमधील ५१८५ विद्यार्थ्यांनी आपले मत नोंदवले होते.

अध्यक्ष पदावर डव्या आघाडीचे एन. साई बालाजी, उपाध्यक्ष पदावर सारिका चौधरी, सरचिटणीस पदावर अजीज अहमद राथेर आणि संयुक्त महासचिव पदावर अमुथा जयदिप यांचा विजय झाला आहे.

जेएनयूएसयूच्या निवडणुकांमध्ये सध्या डाव्या पक्षांची युती आघाडीवर आहे. निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दुसरे स्थान राखून ठेवले आहे. ‘बिरसा फुले आंबेडकर स्टुडेंट असोसिएशन’ (बापसा) तिसऱ्या स्थानावर आगेकूच करत असून पूर्ण निकाल लागल्यावर स्थिती स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

*