Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

‘या’ महिलांमुळे चांद्रयान-२ मोहिमेला ‘चार चांद’

Share

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची महत्वाकांक्षी मोहीम म्हणजेच चांद्रयान २ ने आज अवकाशात यशस्वी झेप घेतली आहे. यानंतर सर्वच माध्यमातून ISRO च्या वैज्ञानिकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याचा दरम्यान या मोहिमेत सहभागी असलेल्या दोन महिलांचे देखील विशेष योगदान लाभले आहे. महत्वाचे म्हणजे इसरॉने प्रथमच अशा मोहिमेत महिलांचा समावेश केला आहे.

दरम्यान मागील आठवड्यात चांद्रयान २ मोहिमेला काही तांत्रिक कारणास्तव स्थगिती देण्यात आली होती. परंतु आज दुपारे यशस्वीरीत्या ही मोहीम पार पाडण्यात आली. या ऐतिहासिक चंद्रयान मोहिमेतदोन महिलांकडे नेतृत्त्वाची धुरा देण्यात आली होती. यामध्ये प्रकल्प संचालक अर्थात प्रोजेक्ट डायरेक्टर मुथय्या वनिता आणि मोहिम संचालक अर्थात मिशन डायरेक्टर रितू करिधल होय.

श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरकडून ही मोहीम लाइव्ह करण्यात आली होती. संपूर्ण देश या मोहिमेकडे डोळे लावून बघत होता. त्यामुळे चांद्रयान २ या मोहिमेतील प्रोजेक्ट डायरेक्टर आणि मिशन डायरेक्टर ही दोन्ही महत्वाच्या जबाबदाऱ्या महिला सांभाळत होत्या.

यापैकी मुथय्या वनिथा या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहेत, तर मिशन डायरेक्टर रितू करिधल यांनी २०१३-१४ मधील मंगळ मोहिमेदरम्यान डेप्युटी डायरेक्टर अर्थात उपसंचालक म्हणून जबाबदारी पार पाडली होती.

या दोन्ही रॉकेट वुमेन गेल्या दोन दशकांपासून इस्रोमध्ये कार्यरत आहेत. यापूर्वी इस्रोने यशस्वी पार पाडलेल्या अनेक मोहिमांमध्ये या दोन्ही रॉकेट वुमेननी मोलाचा वाटा उचलला होता. आता चांद्रयान मोहिमेत सहभागी होऊन मोलाची कामगिरी बजावली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!