Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

मिशन सूर्य : २०२० साली इस्रो सूर्यावर झेपावणार

Share

नवी दिल्ली : भारताचा ऐतिहासिक प्रकल्प असलेला चांद्रयान- २चे काल यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. जगभरातून इस्रोच्या या कामगिरीबद्दल भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चांद्रयान २ च्या यशस्वी प्रयोगानंतर आता पुढे काय? तर इस्रोने त्यांच्या पुढील प्रकल्पाची तयारी सुरु केली आहे. हे मिशन थेट सूर्यावर झेप घेणारा असून २०२० मध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

दरम्यान कोट्यवधी भारतीयांच्या चेहऱ्यावर चांद्रयान मोहिमेनंतर अभिमानस्पद क्षण दिसत होता. दरम्यान या मोहिमेनंतर आता इस्रोचे पुढील मिशन तयार असून हे सूर्यावर असणार आहे. सूर्यावर असणाऱ्या या मिशनचे नाव आदित्य –एल१ असे ठेवण्यात आले आहे. या मोहिमेत सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० केल्व्हिनपेक्षा कोरोनाचे तापमान ३०० पट अधिक आहे, असे का? याच प्रश्नांचे उत्तर इस्रो या मिशनद्वारे शोधणार आहे.

या मोहिमेत इस्रो सुर्याच्या प्रभामंडळाची (कोरोना) रचना समजून घेणार आहे. आदित्य-एल१ पृथ्वीपासून १. ५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असेल. तिथून तो सूर्यावर लक्ष ठेऊन, सूर्याचा बाहेरील स्टार ‘तेजोमंडळ’ चे विश्लेषण करेल. आदित्य-एल १ सूर्याचा फोटोस्फेयर आणि क्रोमोस्फेयर यांचाही अभ्यास करू शकतो. सूर्यामधून बाहेर येणारे विस्फोटक कण देखील या मोहिमेत अभ्यासाचा विषय ठरणार आहेत.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!