Type to search

Breaking News maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

गौरवास्पद! धामणगावचे सुपुत्र बनले लडाखचे पोलीस महासंचालक

Share

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवून जम्मू काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केल्यानंतर लडाखचे पहिले पोलीस महासंचालक (हेड ऑफ पोलीस) म्हणून धामणगावचे सुपुत्र सतीश खंडारे यांनी ३१ ऑक्टोबरपासून कार्यभार स्वीकारला आहे.

सन १९९५ मध्ये भारतातून ४२५ वी रँक घेऊन आयपीएस झालेले सतीश श्रीराम खंडारे यांनी धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयातून इयत्ता दहावीची परीक्षा सन १९८६ मध्ये ८६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण केली. त्यानंतर धामणगाव शहरातील सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून ते बारावी उत्तीर्ण झाले.

पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी  महाविद्यालयातुन ते १९९२ मध्ये बीई झाले. त्यानंतर १९९५ मध्ये ते आयपीएस बनले. आयपीएस अधिकारी सतीश खंडारे हे प्रथम जम्मू काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला.

पोलीस विभागात दाखल होण्याचे स्वप्न त्याने जिद्दीने पूर्ण केले. आता लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले पोलीस महासंचालक म्हणून काम करण्याचा बहुमान त्याला मिळाला आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
-श्रीराम खंडारे, आयपीएस (सतीश खंडारे यांचे वडील)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!