Breaking : ग्रिटींग बनवणाऱ्या ‘आर्चीस’च्या कारखान्याला आग

0
नवी दिल्ली : दिल्लीतील नारायणा औद्योगिक क्षेत्रात एका पेपर कार्ड कारखान्याला भीषण आग लागली. अग्निशमनच्या 29 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळी लागलेल्या या आगीत अद्याप कोणतेही जीवितहानीचे वृत्त नाही.

या कारखान्यात आर्चिज सारख्या मोठ्या ब्रँडच्या कार्डांचीही निर्मिती होते. मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश पवार यांनी सांगितले की अग्निशमनच्या 9 गाड्या दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत गेल्या तीन दिवसांतील आगीची ही तिसरी घटना आहे.

LEAVE A REPLY

*