Type to search

क्रीडा

बांग्लादेशचा पेपर सोडवण्यासाठी विराटसेना सज्ज

Share

नवी दिल्ली : भारत आणि बांग्लादेश या दोन संघांमधील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर खेळवण्यात येणार आहे. ज्याचं नुकतंच नामकरण ‘अरुण जेटली’ ह्यांच्या नावे करण्यात आलं आहे. या मैदानावर एकूण ४१,८२० प्रेक्षक बसू शकतात. हे मैदान बहादुरशहा जफर मार्ग येथे आहे.

भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार शिखर धवन, लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रिषभ पंत, मनीष पांडे यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये कृणाल पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर हे पर्याय आहेत. गोलंदाजीत दीपक चाहर, शार्दूल ठाकूर, खलिल अहमद, युझवेद्र चहल, आणि राहुल चाहर हे पर्याय आहेत.

बांग्लादेश संघाला मालिकेपूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन २ वर्षांसाठी निलंबित झाला आहे. फलंदाजीत लिटन दास , मोहंमद नईम, शौम्य सरकार, मोहमदुल्लाह अल हुसेन आफ हुसेन, अमिमुल हुसेन, मुशफिकर रहीम आहेत. गोलंदाजीत अराफत सनी, मुस्तफिजूर रहेमान आणि शरफूल हुसेन हे पर्याय आहेत.

या मैदानावरील सरासरी धावसंख्या भारत २०२-३ विरुद्ध न्यूझीलंड १ नोव्हेंबर २०१७ नीचांकी धावसंख्या १२० श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड २८ मार्च २०१६, सर्वात मोठा विजय भारत ५३ धावांनी विरुद्ध न्यूझीलंड निसटता विजय इंग्लंड १५ धावांनी विरुद्ध अफगाणिस्तान २३ मार्च २०१६
सर्वाधिक अर्धशतके हाशिम आमला १ २०१६ फलंदाजीतील सर्वाधिक सरासरी विराट कोहली ११ चेंडू २६ धावा २३६. ३६

सर्वाधिक बळी : मोहंमद नबी ४ षटके ० निर्धाव १७ धावा २ बळी, एका डावात सर्वाधिक ४ बळी क्रिस जॉर्डन सर्वाधिक झेल २ मोहंमद नबी
बळी. एका डावात सर्वाधिक ४ बळी क्रिस जॉर्डन सर्वाधिक झेल२ मोहंमद नबी.

हवामान : भरपूर सूर्यप्रकाश, नाणेफेकीचा कौल निर्णयक ठरू शकतो.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!